कुर्ला बस अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज आलं समोर ; पहा बसच्या आतमध्ये नेमकं काय सुरु होतं?
कुर्ला बस अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज आलं समोर ; पहा बसच्या आतमध्ये नेमकं काय सुरु होतं?
img
Dipali Ghadwaje
सोमवारी रात्री कुर्ल्यामध्ये घडलेल्या भीषण अपघातात कुणी आपली आई, कुणी वडील, कुणी बहिण, तर कुणी भाऊ गमावला. कुर्ला डेपोतून नेहमीप्रमाणे निघालेली बस आपल्याला आपल्या गंतव्य स्थानापर्यंत घेऊन जाईल, या आशेने बसमध्ये प्रवासी चढले.

बसवाहकाची तिकीट काढण्याची लगबग सुरु झाली. बसमध्ये चढताच प्रवाशांनी सीट पकडल्या आणि कुणी आपापसांत, तर कुणी फोनवर बोलण्यात मग्न झाले अन् काही जण आपल्या फोनमध्ये डोकी घालून बसले. प्रवासी आपल्या धुंदीत असताना अचानक बसचा वेग वाढला अन् पुढच्या 15 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. आता बस अपघातादरम्यानचा बसच्या आतमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

कुर्ल्यातील भीषण बस अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. कुर्ला डेपोतून निघालेली बस पहिल्या स्पीड ब्रेकपर्यंत पोहोचली, तेवढ्यात बसने अचानक वेग घेतला. बसचालकाने ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय दिल्याने घात झाला, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बसने रस्त्यावर चालणारी माणसं, उभ्या असलेल्या रिक्षा यांना सुमारे 250 मीटरपर्यंत फरफटत नेलं.

यावेळी बसच्या आतमध्ये नेमकं काय सुरु होतं, याचं सीसीटीव्ही समोर आलं आहे.nकुर्ला बस अपघातात आतपर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. 

पाहा बसमधील थरारक व्हिडीओ

 

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group