प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी बस उलटली, दोघांचा जागीच मृत्यू
प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी बस उलटली, दोघांचा जागीच मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
चंद्रपूरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव एसटी बस रस्त्याच्या कडेला उलटून मोठा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही एसटी बस रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर- वरोरा मार्गावरील चारगावजवळ ही घटना घडली. ही एसटी बस चिमूरवरून चंद्रपूरकडे जात होती. 

नाशिक : वास्तुदोष दूर करण्याच्या बहाण्याने तिघींकडून लाटले सुमारे १७ तोळे सोने

हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ८ जण गंभीर जखमी झालेत. अपघातामध्ये १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये बसच्या वाहकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या बसमधून ३५ जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तात्काळ जखमी प्रवाशांना उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून रुग्णांवर उपचार सुरु आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group