टायर फुटल्याने प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेटली
टायर फुटल्याने प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेटली
img
दैनिक भ्रमर

पुणे (भ्रमर वृत्तसेवा) :- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टायर फुटल्याने खासगी बसने अचानक पेट घेतला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्व प्रवासी सुखरुप  बचावले.

मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती. आढे गावच्या हद्दीत सकाळच्या सुमारास ही घटना घडली. बसने अचानक पेट घेतल्याने अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाश्यांना सुखरूप खाली उतरवले. प्रवासी जीव मुठीत घेऊन बस खाली उतरले. त्यानंतर या सगळ्यांनी बर्निंग बसचा थरार अनुभवला.  त्यामुळे कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. सगळे प्रवासी सुखरुप असून, आगीवर अग्निशमन दल आणि यंत्रणेने नियंत्रण मिळवले आहे. 

आज सकाळी साडेसात वाजता आढेगावच्या हद्दीत  खासगी बसचे टायर फुटले. त्यामुळे बसने जागेवरच पेट घेतला. त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्याने बसला आगीने घेरले. या बसमध्ये 36 प्रवासी होते. टायर फुटल्याची माहिती मिळताच बस चालकाने प्रसंगावधान राखत सगळ्या प्रवाशांना बसमधून सुखरूप उतवरून दिले.  आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नाने ही आग विझवली गेली. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group