रस्त्यावर बस उलटल्याने 18 प्रवाशांचा मृत्यू
रस्त्यावर बस उलटल्याने 18 प्रवाशांचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर

नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) : मेक्सिको देशातील ओझाका राज्यात  झालेल्या एका भीषण बस अपघातात 18 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

या अपघातात मृत्युमुखी पडलेले बहुतांश प्रवासी हे स्थलांतर करत असल्याचे बोलले जात आहे. मेक्सिकोमधून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत. यातीलच काही नागरिकांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन लहान मुले व दोन महिलांचा समावेश असल्याचे समजते. याचबरोबर या अपघातात जखमी झालेल्या 27 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ओझाका कुआकनोपालन महामार्गाच्या वळणावर हा अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे. हा प्रदेश डोंगराळ असल्याने या ठिकाणी ही बस उलटली. अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता ही घटना घडली. नुकतेच स्थलांतर करताना एका लहान मुलासह दहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अशाच पद्धतीने एक ट्रक उलटला होता. या ठिकाणाहून नेहमीच मोठ्या प्रमाणावर नागरिक स्थलांतर करत असतात.

इतर बातम्या
Join Whatsapp Group