"चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् एसटी थेट बस धरणात ..... " ; नेमका कसा घडला अपघात?
img
Dipali Ghadwaje
रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एका एसटी बसचा भीषण अपघात झालाय. ही बस दाभोळवरून मुंबईच्या दिशेने येत होती. घाटातील उतारावरून जात असताना, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत घरंगळत गेली. मात्र, त्या ठिकाणी एक झाड होते. झाडाला ती बस अडकली आणि तिथेच अडकली.

देव बलवत्तर म्हणून एका झाडामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. अन्यथा बस धरणात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. या अपघातात ७ जण जखमी असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या  माहितीनुसार, एसटी बस प्रवाशांना घेऊन, मंडणगड शेनाळे घाटातून जात होती. या घाटात अनेक अतितीव्र उताराचे रस्ते आहेत. यापैकी एका उतारातून जात असताना, चालकाचे गाडीवरील ताबा सुटला. दरीतील झाडाझुडमांमधून बस थेट धरणाच्या दिशेनं गेली. बस वेगाने दरीच्या दिशेने जात असल्याचं पाहून प्रवाशांना जाग आली. या दरीच्या खालच्या बाजूला एक धरण आहे आणि त्याच्या जवळ एक मोठे झाड आहे. मात्र, बस घसरत थेट पंधरा ते वीस फूट दरीत कोसळली. परंतु, धरणाच्या दिशेनं जात असताना, झाडाला धडकली.

दरीत कोसळताना बस झाडाला धडकली आणि तिथेच अडकली. यानंतर बचावपथकाने तातडीने धाव घेत प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले. एसटीत एकूण ४१ प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. एसटीतील प्रवासी सुखरूप असून, त्यांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र, ४१ पैकी ७ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

ही बस दरीत कोसळल्यानंतर एका बाजूला बस पूर्णपणे आडवी पडली होती. या अपघातावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला असून, या व्हिडिओत मागच्या भागातील प्रवासी बाहेर पडत असताना दिसत आहे. मात्र, देव बलवत्तर म्हणून एका झाडामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group