हृदयद्रावक ! प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण अपघात ; ५ जणांचा मृत्यू , अनेक जखमी
हृदयद्रावक ! प्रवाशांनी भरलेल्या बसला भीषण अपघात ; ५ जणांचा मृत्यू , अनेक जखमी
img
Dipali Ghadwaje
पुण्याजवळील ताम्हिणी घाटामध्ये प्रवासी बसला भीषण अपघात झाला आहे.  ताम्हिणी घाटातील एका धोकादायक वळणावर, वॉटरफॉल पॉईंटजवळ बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 27 हून अधिक लोक जखमी झाले. त्यांना तातडीने माणगाव ग्रामीण रुग्णालयातच हलवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

अपघातावेळी बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. बसमध्ये आणखी काहीण जण अडकल्याची भीती व्यक्त होत असून बचाव पथकाचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव येथून जाधव कुटुंब हे महाड येथील बिरवाडी येथे बसमधऊन लग्नसमारंभासाठी खासगी बसने जात होते. purple ट्रॅव्हल्सची खाजगी बस (क्रमांक.MH14GU3405) ही रस्त्यावरून जात असताना ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ धोकादायक वळणावर बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि बसचा भीषण अपघात झाला. 

ही गाडी पूर्णपणे पलटी झाली आणि पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 2 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश आहे. संगीता धनंजय जाधव , गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार आणि वंदना जाधव अशी मृतांची नावे असून पाचव्या मृत पुरूषाची ओळख अजून पटलेली नसल्याने त्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

अपघातात 27 हून अधिक लोक जखमी असून काही जण बसमध्येही अडकले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्यांच्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून पोलीस, रेस्क्यू टीम, आणि वैद्यकीय मदत घटनास्थळी दाखल झाली आहे. जखमींवर माणगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या अपघाताप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group