भीषण अपघात! खाजगी ट्रॅव्हल बस दरीत कोसळली; वाचा कुठे घडली ही घटना
भीषण अपघात! खाजगी ट्रॅव्हल बस दरीत कोसळली; वाचा कुठे घडली ही घटना
img
Jayshri Rajesh
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या हाय पॉइंट जवळ एका खाजगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला. यात सातपुडा पर्वतरांगातील मेळघाटमधील खटकालीजवळील हाय पॉइंट जवळ बस दरीत कोसळली आहे. या बसमधील 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झालेआहे. तर बस मधील सर्व लहान मुलं सुरक्षित आहे.

या अपघाताची माहिती मिळताच अकोटवरून एकलव्य बचावपथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. प्रवाशांना दरीतून काढून  त्यातील जखमी लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं
 
मेळघाटमधील सातपुडा पर्वतरांगातील हाय पॉइंट जवळ  खाजगी ट्रॅव्हल्स पलटी होऊन दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही बस अकोटवरून धारणी येथे येत असताना ट्रॅव्हल आकोट धारणी घाटात आली असता बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ही बस थेट दरीत जाऊन कोसळली. या बसमध्ये 25-30 प्रवासी असून त्यातील 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच एकलव्य बचाव पथकासह वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी जखमी लोकांना सुखरूप दरीतुन काढण्यात पोलीस आणि स्थानिकांना यश आले असून जखमींना टेम्ब्रूसोडा आणि अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आले आहे. तर या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्या, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group