चहासाठी घेतलेल्या
चहासाठी घेतलेल्या "ब्रेकने" वाचवला प्रवाशांचा जीव... पहा कुठे घडली ही घटना
img
Jayshri Rajesh
बुलढाणा जिल्ह्यातील  मेहकर फाट्यावर मागील वर्षी एक जुलै रोजी खाजगी बसचा समृद्धी मार्गावर भीषण अपघात होऊन त्यामध्ये २५ जण जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यात ट्रॅव्हल्सचा कोळसा देखील झाला होता.आजच्या अपघाताच्या घटनेत ४८ प्रवासांचा जीव वाचल्यानंतर बुलढाणा परिसरातील नागरिकांच्या त्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या.

सविस्तर माहिती अशी कि, वऱ्हाडी मंडळी चंद्रपूर येथून बुलढाणा येथे ट्रॅव्हल्सने लग्न आटपून येत होते. आज पहाटे मेहकर फाट्यावर खाजगी बस चहापाणी करण्यासाठी थांबली. यावेळी काही प्रवासी गाढ झोप येत होते. मात्र बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात येतात बसमध्ये एकच खळबळ होऊन सर्व प्रवासी जागी झाले. जीव वाचवण्यासाठी आणि खाली उतरण्यासाठी बसमधील प्रवासांची एकच धावपळ उडाली. यावेळी काही प्रवासी बसमधून खाली उतरताच या खाजगी बसने रौद्र पेट घेतला. काही क्षणात या बसचा कोळसा झाला आणि केवळ सांगाडाच उरला.

बस पेटल्याची माहिती परिसरात  वाऱ्यासारखी पसरली. या भीषण दुर्घटनेची माहिती चिखली पोलीस अंतर्गत चिखली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेला अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करून या रौद्र हा रुप धारण केलेल्या बसचा अग्नीतांडव आटोक्यात आणला. मात्र ही आग विझवण्यासाठी त्यांना अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागला  खाजगी बस बुलढाणा येथील पवार यांच्या मालकीची असल्याचे समजते.

विदर्भाच्या एका जागेहून चंद्रपूरच्या बुलढाणा जिल्ह्यात ४८ प्रवासी घेऊन ही बस निघाली होती. नशीब बलवत्तर म्हणून सर्वांचे प्राण वाचले. प्रवासी थोडक्यात बचावले असले तरी त्यांच्या मौल्यवान बॅग दागिने मात्र जळून खाक झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागून बस पेटल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group