समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
img
Dipali Ghadwaje
समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला आहे.  समृद्धी महामार्गावर मेहकरनजिक खाजगी लक्झरी बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला आहे. खाजगी लक्झरी बसचा रस्त्याच्या कडेला उभी असताना मागून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिल . या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  गणराज ट्रॅव्हल्सची बस मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात होती. सकाळी 5.45 वाजेच्या सुमारास मेहेकरनजिक बसच्या टायरची हवा चेक करण्यासाठी खाली उतरला होता. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. यात बस चालक जागीच ठार झाला. तर बस मधीलच एका प्रवाशाचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण 37 प्रवाशी प्रवास करत होते.  

कोल्हापुरात बस नदीत कोसळली
गोव्याहून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने येणारी ट्रॅव्हल्स बस शिराळा तालुक्यातील कोकरूड पुलावरून वारणा नदीपात्रात कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.
 
ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढत दुसऱ्या वाहनातून पाठवण्यात आलं आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group