देवीचं दर्शन घेऊन निघाले अन् फुल्ल स्पीडमध्येअसलेली बाईक एसटी बसवर आदळली ; भीषण अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू
देवीचं दर्शन घेऊन निघाले अन् फुल्ल स्पीडमध्येअसलेली बाईक एसटी बसवर आदळली ; भीषण अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू
img
Dipali Ghadwaje
बुलढाणा : जिल्ह्यातील मेहकर-चिखली मार्गावर मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  मेहकर - चिखली रस्त्यावरील वरदडा या गावाजवळ हा अपघात झाला. एक दुचाकी एसटी बसवर जोरात आदळून हा अपघात झाला. यावेळी दुचाकी प्रचंड वेगात असल्याने त्यावरुन प्रवास करणाऱ्या तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही तरुण मेहकर परिसरातील देवीचे दर्शन घेऊन आपल्या घरी परतत होते. गोपाल सुरडकर , सुनील सोनोने आणि धनंजय ठेंग, अशी या मृत तरुणांची नावे आहेत.

हे तिघेही एकाच बाईकवरुन प्रवास करत होते. अपघाताच्यावेळी त्यांच्या बाईकचा वेग खूपच जास्त होता, मेहकर-चिखली महामार्गावरुन वेगात दुचाकी पिटाळत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ते वरदडा फाट्याजवळ आदिवासी पारधी शाळेजवळ रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या एका एसटी बसवर पाठीमागच्या बाजूला जाऊन आदळले.

ही एसटी बस बिघडली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही बस वरदडा  गावाजळ रस्त्यालगत उभी करुन ठेवण्यात आली. तरुणांची प्रचंड वेगात असलेली दुचाकी नेमकी याच एसटीवर येऊन जोरात आदळली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, गोपाल, सुनील आणि धनंजय यांनी जागेवरच प्राण सोडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची संधीही मिळाली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
आणखी वाचा >>>> "पुरुष असताना घर एक असतं, पण स्त्रियांच्या हट्टाने....." ; अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?

इतर बातम्या
Join Whatsapp Group