वाडीवऱ्हे येथे टायर फुटल्याने स्कॉर्पिओ उलटली; 10 प्रवासी जखमी
वाडीवऱ्हे येथे टायर फुटल्याने स्कॉर्पिओ उलटली; 10 प्रवासी जखमी
img
दैनिक भ्रमर

इगतपुरी (भ्रमर वार्ताहर) :- नाशिक-मुंबई महामार्गावर पुन्हा आज सकाळी स्कॉर्पिओे गाडीचे टायर फुटल्यामुळे अपघात होऊन दहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

काल (दि. 25) नाशिक-मुंबई महामार्गावरील इगतपुरीजवळील वाडीवऱ्हे येथे स्कॉर्पिओ इको गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये 8 जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच आहे नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाला मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हेजवळ प्रणाम हॉटेल भागात अपघात झाला. अचानक टायर फुटल्यामुळे हे वाहन उलटून अपघातग्रस्त झाले.

आज पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. एमएच 18 डब्ल्यू 5855 असा अपघातग्रस्त वाहनाचा क्रमांक आहे. या अपघातात वसिम लतीफ बागवान (वय 34), अहमद रजा (वय 18), समशेर रजा (वय 40), इस्रार अहमद, शेख हापिज (वय 48), बदरुनिसा (वय 45), जमील भानू (वय 42), ईकरा शेख (वय 17), फरहान शेख (वय 14), आफिक शेख (वय 11) हे दहा जण जखमी झाले आहेत.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धामच्या मोफत रुग्णवाहिकेने समयसूचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सुदैवाने सर्वांचे प्राण वाचले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group