वाईजवळ रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात
वाईजवळ रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात
img
दैनिक भ्रमर

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा
साताऱ्यातील वाईजवळ अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिली. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले आहेत. त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. रामदास आठवले वाईहून मुंबईच्या दिशेला येत होते. या दरम्यान एका कंटेनरने त्यांच्या गाडीला धडक दिली.

रामदास आठवले यांच्या वाहनाच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रामदास आठवले यांच्याकडून अद्याप तरी अपघातानंतर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group