वडनेरला रिक्षाच्या अपघात परिचारिकेचा मृत्यू
वडनेरला रिक्षाच्या अपघात परिचारिकेचा मृत्यू
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी):-रुग्णसेवे साठी रुग्णालयात जाणाऱ्या परिचारिकेचा (नर्स) रिक्षाला अपघात झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.या घटनेमुळे कधी नव्हे त्या डॉक्टर,नर्स व वार्डबॉय यांचे डोळे पानवले. तर शहरभरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
या अपघातात मयत झालेल्या परिचारिका तथा नर्स चे नाव प्रिया भीमराव जाधव उर्फ प्रिया चंद्रपाल पवार (वय 3)वृंदावनइव्हिनिव्ह,उमेश नगर, पाथर्डी शिवार, नाशिक असे आहे.मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास परिचारिका तथा नर्स प्रिया भीमराव जाधव ह्या पाथर्डी फाटा येथून संजय रोहिदास पगारे (वय33)राहणार वडनेर दुमाला, नाशिक ह्यांच्या रिक्षा नंबर MH 15 AK 5975 मधून विहितगांव कडे निघाल्या होत्या.

तेथून त्या बिटको चौक व तेथून दसक येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात रुग्णसेवे साठी जात असतांना वडनेर येथे रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षा चालक संजय पगारे हे रिक्षा बाजूला फेकले गेले तर परिचारिका तथा नर्स प्रिया भीमराव जाधव उर्फ प्रिया चंद्रपाल पवार ह्या रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.जोरदार आवाज झाल्याने नागरिकांनी अपघाताच्या दिशेने पळापळ केली. परिचारिका पवार ह्या रस्त्यावर पडून होत्या.

मात्र ही वार्ता माजी नगरसेवक जगदीश पवार यांना समजताच त्यांनी गावकरी यांना जखमीस बिटको रुग्णालयात दाखल करण्यास विनंती केली. मात्र रुग्णालयात दाखल करताच वैद्यकीय अधिकारी यांनी परिचारिका तथा नर्स प्रिया भीमराव जाधव उर्फ प्रिया चंद्रपाल पवार यांना तपासून मृत घोषित केले.कधी नव्हे त्या डॉक्टर,नर्स व वार्डबॉय यांचे डोळे पानवले आणि ते ढसाढस रडू लागले.

घटनेची माहिती मिळताच मनपा आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण यांनी भेट देऊन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना दिलासा दिला. यावर माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी मनपा आरोग्य अधिकारी चव्हाण यांना धारेवर धरीत परिचारिका प्रिया पवार ह्या मनपा मध्ये राज्य सरकार ने खाजगी भरती केलेल्या NUHM यात काम करीत होत्या. पूर्वी त्या पिंपळखांब येथे सेवा देत होत्या, त्या नंतर बिटको रुग्णालयात व त्याची बदली दसक येथे करण्यात आली होती.पाथर्डी फाटा येथून दसक इतके लांब बदली करण्याचे काम का केले गेले? ज्यांनी बदली केली त्याच्यावर कारवाई करावी, त्यांच्या वारसाला योग्य मोबदला द्यावा अशी मागणी केली.

 मयत परिचारिका तथा नर्स प्रिया भीमराव जाधव उर्फ प्रिया चंद्रपाल पवार यांच्या पश्चात सासू, सासरे,पती चंद्रपाल सांडू पवार, मुलगा सम्यक (वय 11)व शौर्य (वय 02)आहेत. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातची माहिती समजताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी,राकेश भामरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कोकाटे, पोलीस हवालदार नवनाथ होलगीर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

रात्री उशिरा पर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम उपनगर पोलिसात सुरु होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group