तांदुळवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार
तांदुळवाडी फाटा येथे ट्रकच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार
img
दैनिक भ्रमर

येवला (दीपक सोनवणे) :- नगर मनमाड महामार्गावर अपघाताचा स्पॉट असलेल्या तांदुळवाडी फाटा येथे मालवाहू ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात होऊन यात मोटरसायकल स्वार ठार झाला आहे

रमेश नामदेव गायकवाड (वय 55) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून ट्रकचालक घटनास्थळावरून प्रसार झालेला आहे.
याबाबतची माहिती पोलीस पाटील किशोर गायकवाड यांनी येवला तालुका पोलिसांना दिली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शववि्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल केला आहे.

पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group