मोठी बातमी : नाशिक दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात
DB
नाशिक : नाशिकमधून आताची मोठी बातमी समोर येत आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार , आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यामागे असलेल्या दुचाकीस्वाराने एका कारला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झालाय. मनमाड शहरात जात असताना हा अपघात घडलाय. दुचाकीच्या धडकेने कारच्या काचा फुटल्या आहेत.