८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अकरा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आज अखेर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर लागणार आहे. राज्यात काही ठिकाणी मतदान केंद्रवर गोंधळाची तर कुठे वाद झाल्याची स्थिती निर्माण झाली. येवला नगरपरिषदेतही राडा झाल्याचं पहायला मिळालं.
येवला नगरपरिषद निवडणुकीदरम्यान प्रभाग नवीन क्रमांक ९ मधील सहस्रार्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर दोन गटांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या समर्थकांमध्ये मतदान केंद्रातील ये-जा करण्यावरून वाद निर्माण झाला. हा वाद चिघळत जाऊन प्रत्यक्ष हाणामारीपर्यंत पोहोचला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करून दोन्ही बाजूंच्या समर्थकांना पांगवले. येवल्यामध्ये छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांध्ये थेट लढत आहे.