येवला तालुक्यात विसापूरगावी विहिरीत पडलेल्या बिबट्याला केले जेरबंद
येवला तालुक्यात विसापूरगावी विहिरीत पडलेल्या बिबट्याला केले जेरबंद
img
Dipali Ghadwaje
येवला : आज सकाळी तालुक्यातील विसापूर येथे विरहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू ऑपेरेशन करून वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. 

आज सकाळी 6 वाजता शेतकरी हे शेतातील विहिरीकडे पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्याना विहिरीत बिबट्या असल्याचे दिसून आले. त्यांनी ही  माहिती ग्रामस्थांना कळवली त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती कळविण्यात आली.   

त्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक अतिरिक्त कार्यभार वनपरीक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव भाऊसाहेब, वनपरिमंडळ अधिकारी माळी,  वनपरिमंडळ अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली वनरक्षक वाघ,खरात,पंकज नागपुरे गोपाल राठोड़, राजेंद्र दौड़, गोपाल हालगावकर, वनसेवक बालकृष्ण सोनवने, संजय  गुंजाळ, अंकुश गुजाळ भाऊसाहेब झाल्टे, वाळीबा सोनवणे यांनी घटनास्थळी दाखल होऊन विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू ऑपेरेशन द्वारे बाहेर काढले आणि त्यानंतर एका वाहनातून त्याला जवळ असलेल्या रोपवाटिकेत नेण्यात आले.

यावेळी गावातील पोलिस पाटिल,  उपसरपंच व असंख्य शेतकरी उपस्थित होते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group