नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- येथील विहितगाव, वडनेर रोडवरील हंडोरे मळा या ठिकाणी संध्याकाळी साडेसात वाजता दारात खेळत असलेल्या बालकावर बिबट्याने झडप घातली.
बिबट्या ओढून नेत असल्याने या बालकाच्या मानेवर डोक्यावर जबर जखमा झाल्या असून आरडाओरड केल्यानंतर बालकाला सोडून बिबट्या पळून गेल.जखमी बालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विहितगाव,वडनेर रोडवरील हंडोरे मळा या वालदेवी नदीकिनारी एक वस्ती आहे. या वस्तीतील चार वर्षीय ऋषिकेश प्रकाश चांद्रे हा आई स्वयंपाक करत असल्याने ओट्यावर खेळत असताना बाजून असलेल्या जंगलातून बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. ऋषिकेश च्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड केली, तोपर्यंत बिबट्याने ऋषिकेश ला काही अंतरापर्यंत फरपटत नेत होता.
आरडाओरडा ऐकून बिबट्याने ऋषिकेश ला सोडून वालदेवीच्या नदीकिनारी असलेल्या जंगलात पळून गेला. जखमी ऋषिकेश ला प्रथम बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र मानेवर डोक्यावर बिबट्याचे नख व दात लागल्याने रक्तभांभाळ झालेल्या ऋषिकेश ला पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माजी नगरसेवक जगदीश पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विक्रम कोठुळे यांनी तात्काळ वनविभागाची संपर्क साधून या जखमी ऋषिकेश च्या परिवाराला आर्थिक मदती करण्यात यावी व घटनास्थळी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी केली. घटनेची माहिती समजतात वनाधिकारी अनिल अहिरराव, विजयसिंघ पाटील यांनी हॉस्पिटल व घटनास्थळी धाव घेतली.