येवला तालुक्यात ८ दिवसांचे अर्भक आढळून आल्याने खळबळ
येवला तालुक्यात ८ दिवसांचे अर्भक आढळून आल्याने खळबळ
img
दैनिक भ्रमर
येवला  | प्रतिनिधी (दीपक सोनवणे) :

शनिवार, दि. १३ एप्रिल रात्री आठ वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील मालखेडा या ठिकाणी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने केवळ आठ दिवसांचे पुरुष जातीचे अर्भक शेतातील गवतामध्ये बेवारस सोडून दिले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एकीकडे नवविवाहित आपत्यांना आपत्य होत नसल्यामुळे ते नैराशीत जात आहे. मात्र कोणीतरी निर्दयी माता-पित्याने अनैतिक संबंधातून जन्मलेले हे अर्भक सोडून दिले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

इराणचा इस्रायलवर ड्रोन अटॅक ; एअरस्पेस बंद, आणीबाणी घोषित

या घटनेची माहिती गावातील कामगार पोलीस पाटील यांना देण्यात आल्यानंतर येवला तालुका पोलिसांना घटनास्थळी पाचरण करण्यात आले दरम्यान तालुका पोलिसांनी हे अर्पण ताब्यात घेतले असून त्याच्यावर आता उपचार करून त्याच्या मातापित्यांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, या अर्बक संदर्भात कोणालाही काही माहिती असल्यास येवला तालुका पोलिसांची संपर्क करावा असे आव्हान करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group