नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनर खाली सापडून वृद्ध ठार
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनर खाली सापडून वृद्ध ठार
img
दैनिक भ्रमर
येवला :- नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या गवंडगाव येथील टोलनाका परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू असताना झालेल्या अपघातात एका वृद्धाचा कंटेनर खाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. निवृत्ती फकीरा फड (वय 60 रा. धामोडे) असे अपघातात जागीच मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांच्यासोबत मोटरसायकलवर असलेल्या वृद्ध महिला किरकोळ जखमी असून परिसरातील नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी सदरचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येवला येथे आणला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group