येवला तालुक्यात विद्युत रोहित्रावर शॉट सर्किटमुळे 11 मेंढ्यांचा मृत्यू
येवला तालुक्यात विद्युत रोहित्रावर शॉट सर्किटमुळे 11 मेंढ्यांचा मृत्यू
img
DB
 येवला :  तालुक्यातील पुरणगाव येथे शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसात गावठाण परिसरातील असलेल्या विद्युत रोहित्रावर वायरचा शॉर्टसर्किट झाल्याने रोहित्रामध्ये विजेचा प्रवाह उतरला होता. दरम्यान या ठिकाणी चरत असलेल्या मेंढ्या या एकापाठोपाठ विजेचा प्रवाह उतरल्यामुळे शॉक लागून मृत्युमुखी पडल्या. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे या तालुक्यातील प्रल्हाद महादू वाघमोडे हे आपल्या मेंढ्या घेऊन येवला तालुक्यात भटकंती करत होते.  आज पुरणगाव परिसरात त्या मेंढ्या चरत असताना ही दुर्दैवी घटना घडली. 

दरम्यान यावेळी  येवल्याचे तहसीलदार आबा महाजन यांनी स्थानिक तलाठी यांना पंचनामाच्या सूचना दिल्या असून महावितरण कंपनीने त्वरित भरपाई द्यावी ही मागणी मेंढपाळांच्या वतीने करण्यात आलेली आहे. 
yeola | sheep |
इतर बातम्या
Join Whatsapp Group