आनंदाची बातमी ! येवल्यातील पैठणी उद्योगाला 12 कोटी 23 लाखांची उद्योग विभागाकडून मंजुरी
आनंदाची बातमी ! येवल्यातील पैठणी उद्योगाला 12 कोटी 23 लाखांची उद्योग विभागाकडून मंजुरी
img
दैनिक भ्रमर
केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरात येवल्याच्या पैठणीची मोठी चर्चा असते. अगदी काही हजारांपासून ते लाख किमतीच्या पैठणी विकत घेण्यासाठी महिलांची लगबग असते. महाराष्ट्राचं हे भूषण असलेल्या येवल्याच्या पैठणी उद्योगाला अधिक चालना मिळावी यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. 
मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथील पैठणी कलाकारी असोसिएशनला सामाईक सुविधा केंद्र  (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास (MSICDP)  योजनेंतर्गत या केंद्राची उभारणी केली जाणार आहे. यासाठी 12 कोटी 23 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सेंटरमुळे येवल्यातील पैठणी उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. 

मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला येथे पैठणी क्लस्टर साकारण्यात आला आहे. या पैठणी क्लस्टरमध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्यासाठी त्यांचा सातत्याने राज्यशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याच्या उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांसमवेत त्यांनी या केंद्राची पाहणी करत बैठक घेतली होती. यावेळी या केंद्राला अधिक निधी मंजूर करून सुविधा निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group