येवला (दीपक सोनवणे) : शहरा नजिक असलेल्याला येवला कोपरगाव रोड म्हसोबावाडी होरिजन अकॅडमी शेजारी राहत असलेले गट नंबर 268/7 येथे जबरी चोरी झाली आहे. शिंदे कुटुंब हे नाशिक येथे वैद्यकीय कामासाठी गेले असता चोरट्यांनी ही संधी साधली आहे.
सचिन भैय्या साहेब शिंदे यांच्या घरातील सेफ्टी डोअरचे लोखंडी लॉक तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातील एलसीडी टीव्ही तसेच इन्वर्टर बॅटरी व रोख रक्कम सतरा हजार रुपये तसेच सोन्याची शॉर्ट पोत, सोन्याचे दागिने असा ऐवज तसेच किराणा सामान देखील चोरून नेला.
यासंदर्भात येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. दरम्यान या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस करीत आहे.