येवल्यात बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात; ३ गंभीर जखमी
येवल्यात बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात; ३ गंभीर जखमी
img
दैनिक भ्रमर
येवला प्रतिनिधी, दीपक सोनवणे : येवला भारम रोडवर डोंगरगाव जवळ बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने एसटी बस व ट्रॅक्टरचा भीषण अपघात ट्रॅक्टर मधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

येवला राहडी बस क्रमांक एम एच 20 बी एल 0238 एसटी बस वरील चालकाचे नियंत्रण  सुटल्याने वळण रस्त्या वर   डोंगरगाव जवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच 21- 45 31 वर जोरात आदळल्याने   ट्रॅक्टर चालक हुसेन बहादुर पटेल , फिरोज मेहबूब पटेल  व सलमान युसुफ पटेल सर्व राहणार तळवाडे गंभीर जखमी झाले आहेत. 

दरम्यान, जखमींना तातडीने तळवडे गावातील देविदास भोसले यांच्या खाजगी वाहनाने येवला येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत या अपघातात बसमधील काही प्रवाशांना देखील किरकोळ दुखापत झालेले आहेत या घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करीत आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group