येवला (दीपक सोनवणे) :- रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण असतो बहीण किती दूर असली तरी रक्षाबंधनासाठी ती आपल्या भावाच्या घरी येत असते. येवला तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मोहारे यांची बहीण जानकी बडोदे या चांदवड येथे असतात. त्या काल येवला बस स्थानक परिसरात आल्या असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची पोत गर्दीचा फायदा घेत ओरबाडून पोबारा केला.
ही बाब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने येवला बसस्थानक परिसरात धाव घेतली. या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता केवळ एक दोनच कॅमेरे सुरू असून मुख्य कॅमेरा हा बंद असल्याने तो जाणून-बुजून बंद केला गेलाय का असा सवाल उपस्थित झाला आहे.
दरम्यान याप्रसंगी भाजपच्या वतीने तातडीने आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले असून सदरचे सीसीटीव्ही त्वरित सुरू करावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे राजेंद्र मोहरे, मिननाथ पवार, वीरेंद्र मोहरे, सचिन खरात, माणिक पवार, आधी पदाधिकारी उपस्थित होते