येवला शहर परिसरात बस स्टँड समोरील भागात भारत सीड्स या कृषी सेवा केंद्रात दिनांक 1 जानेवारी 2023 च्या मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाच्या मागील बाजूने पत्रा वाकावून चोरट्याने थेट दुकानात प्रवेश करत गल्ल्यातील रोख रक्कम अंदाजे दहा हजाराची चोरी करीत दुकानातील सामानाची नासधूस केले आहे.
हा सर्व प्रकार सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानदाराच्या लक्षात आला. तसेच या घटनेचे संपूर्ण चित्रकरण दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाले असून सदरच्या घटनेची येवला शहर पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान येवला शहरात व तालुक्यात वाढणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा कधी बसणार असा सवाल परिसरातील नागरिक करत आहे. सदर घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस करीत आहे.