येवल्यातील एका कंपनीत विजेचा शॉक लागून दोन ठार
येवल्यातील एका कंपनीत विजेचा शॉक लागून दोन ठार
img
Dipali Ghadwaje
येवला : येवला-कोपरगाव रोड वरील नांदेसर शिवारात असलेल्या कृष्णा एंझीटेक कंपनीत विजेचा शॉक लागून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.  या घटनने परिसरातुन हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, येवला कोपरगाव रोड लगत नांदेश्वर शिवारात असलेली कृष्णा एंझीटेक ह्या कंपनीतील दोन कामगार हे त्यांचे काम करत असतांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रवीण नानासाहेब मोहन (३०) राहणार नांदूर तालुका येवला,आप्पासाहेब नामदेव गायकवाड (वय ४३) राहणार बदापूर तालुका येवला अशी मयत झालेल्यांची नावे आहे. 

हे दोघे एक मोठी लोखंडी शिडी लोटत असताना विद्युत तारांचा या लोखंडी शिडीला संपर्क होऊन त्या दोघांना शॉक लागल्यानाने त्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. सुभाष सूर्यभान वाघ यांनी ही माहिती शहर पोलिसात दिली आहे. सदर घटना आज दिनांक २६ रोजी सकाळी ११ :१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक लोंढे हे अधिक तपास करीत आहेत. 
yeola |
इतर बातम्या
Join Whatsapp Group