येवला प्रतिनिधी : प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको कारचा येवल्यात भीषण अपघात झाला असून या अपघातात 11 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यात 4 बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , आज पहाटेच्या सुमारास मनमाडकडून शिर्डीच्या दिशेने येत असलेली प्रवासी वाहतूक करणारी इको कार येवल्यातील बाभुळगाव शिवारात आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार थेट बाबुळगाव शिवारातील नाल्यात जाऊन पडली. यामध्ये कारने तीन-चार पलट्या खाल्ल्यामुळे कारमधील 11 जण हे गंभीरित्या जखमी झालेले आहेत यात चार बालकांचा देखील समावेश देखील आहे.
अपघाताची माहिती मिळताच खाजगी रुग्णवाहिकेद्वारे जखमींना येवला उपजिल्हा रुग्णालय व येवल्यातील खासगी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले. मात्र यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे एकाला नाशिक येथे तर एकाला लोणी येथे पाठवण्यात आल्याची माहिती समजते आहे. दरम्यान चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.