चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; पिंपळगाव खांब येथील घटना
चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; पिंपळगाव खांब येथील घटना
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- पिंपळगाव खांब येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकला जखमी झाला आहे. किरण भास्कर जाधव असे या मुलाचे नाव आहे.


घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक तालुक्यातील पिंपळगाव खांब येथे चार वर्षीय किरण भास्कर जाधव या मुलावर बिबट्याने हल्ला केला घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वनविभागाचे अधिकारी दाखल झाले.

नातेवाईकांनी किरणला तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू झाले असून या परिसरामध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा शोध सुरू केला आहे.
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group