अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे.
आगामी राज्यसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे.
आता निवडणूक आयोगाने हा निर्णय दिल्याने आता आमदार अपात्रताचा निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत शरद पवार गटाला चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आलं आहे.