सध्या संपूर्ण देशाचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागून आहे. बिहारमध्ये यंदा कोण बाजी मारणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहे. याचा मुख्य कारण म्हणजे पुढील वर्षी राज्यसभेतून तब्बल 75 खासदार निवृत्त होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये यावरुन चांगलंच राजकारण पाहायला मिळणार आहे.
नोव्हेंबर ते एप्रिल 2026 दरम्यान अनेक मोठे नेते राज्यसभेतून निवृत्त होणार आहे. यामध्ये शरद पवार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे , माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, भाजप नेते हरदीप पुरी, जेडीयू खासदार हरिवंश, सपाचे खासदार राम गोपाल यादव, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी आणि आरएलडी नेते उपेंद्र कुशवाह यांचा समावेश आहे.
या जागा भरण्यासाठी देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे. काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 25 जून 2026 रोजी निवृत्त होणार आहे तर माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि हरिवंश 9 एप्रिल 2026 रोजी निवृत्त होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार देखील एप्रिल 2026 मध्ये निवृत्त होणार आहे.
तर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महाराष्ट्रातून सात सदस्य पुढील वर्षी निवृत्त होणार आहे आणि झामुमोचे शिबू सोरेन आणि काँग्रेसचे शक्तीसिंह गोहिल हे देखील 2026 मध्ये निवृत्त होतील.
तर दुसरीकडे पुढील वर्षी राज्यसभेतून काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते निवृत्त होणार असल्याने या नेत्यांना पुन्हा एकदा निवडून आणण्यात काँग्रेसला मोठी अडचण निर्माण होणार आहे.
सध्या कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणामध्ये काँग्रेसची सरकार आहे. त्यामुळे कमी जागांवर अधिक दावेदार असल्याने काँग्रेस कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर द्रमुकचे विल्सन आणि पीएमकेचे डॉ. अंबुमणी रामदास यांच्यासह सहा नेते 24 जुलै रोजी निवृत्त होणार आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेत चार सदस्यांना नामांकित केले होते. यामुळे राज्यसभेची संख्या 236 वरून 240 झाली आहे, परंतु 24 जुलै रोजी सहा सदस्यांच्या निवृत्तीनंतर ही संख्या पुन्हा 235 होणार आहे.