बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शरद पवारांचं खास ट्विट , वाचा
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शरद पवारांचं खास ट्विट , वाचा
img
Dipali Ghadwaje
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 99 वी जयंती आज प्रत्येक शिवसैनिक साजरी करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा अंधेरी येथील शहाजे राजे क्रिडा संकुलात होणार आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी शिवसेना शिंदे गटाने मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात “शिवोत्सव मेळावा” आयोजीत केला आहे.

अशातच आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शरद पवार यांनी ट्विट केलं अन् आपल्या मित्राच्या आठवणींना उजाळा दिला.

काय म्हणाले शरद पवार?

प्रभावी व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध व्यंगचित्रांच्या माध्यमातून ‘मार्मिक’ भाष्य केले. कुशल संघटक व मुत्सद्दी राजकारणी असलेल्या बाळासाहेबांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा दिला. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसांच्या स्वाभिमान जागृतीसाठी कायम प्रयत्नशील राहिलेले शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन, अशी पोस्ट शरद पवारांनी केली आहे.
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group