...तर उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान, बाळासाहेबांच्या मृतदेहावरून राजकारण तापलं
...तर उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान, बाळासाहेबांच्या मृतदेहावरून राजकारण तापलं
img
वैष्णवी सांगळे
मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांचा दसरा मेळावा पार पडला. दोन्ही मेळाव्यात दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. या मेळाव्यात भाषण करताना शिंदेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा केला. 


रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत खळबळजनक दावा करताना सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते? असा सवाल उपस्थित करून त्यांनी चांगलीच खळबळ उडावली. यानंतर आज रामदास कदम यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुन्हा आव्हान दिलं आहे. 

मी जे बोललो त्यावर उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण करावे. बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला. मी खोटो बोलतोय तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट होऊन जाऊ देत, असं खुलं आव्हान देखील रामदास कदम यांनी दिलं. बाळासाहेब ठाकरेंच्या हातांच्या ठसाचा उपयोग कशासाठी झाला, याबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं, असंही रामदास कदम म्हणाले. 

बाळासाहेब ठाकरे आजारी होते. तेव्हा कोणालाही जवळ जाऊन देत नव्हते. बाळासाहेब गेल्याचं मला डीक्लेअर करायला सांगितलं. मी त्यांना (उद्धव ठाकरेंना) बोललो बाळासाहेब यांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा हे दैवत आहे.  तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले मी हाताचे ठसे घेऊन ठेवलेत. हे माझं आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं सांभाषण होतं. मी काल ठरवून नाही बोललो, ओघाओघाने बोललो, असं रामदास कदम यांनी सांगितले. 50 वर्षे मातोश्री जाणणारा माणूस असा का बोलतो याचा विचार करतो, असंही रामदास कदम म्हणाले.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group