कदमांचं परबांना प्रत्युत्तर, स्टोव्हचा भडका उडाला अन् माझी बायको जळाली; चंद्रग्रहणाच्या रात्री माझ्या नावाने बोकड कापला कदमांच्या परबांवर आरोप
कदमांचं परबांना प्रत्युत्तर, स्टोव्हचा भडका उडाला अन् माझी बायको जळाली; चंद्रग्रहणाच्या रात्री माझ्या नावाने बोकड कापला कदमांच्या परबांवर आरोप
img
वैष्णवी सांगळे
शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले. आता आजही या आरोपांवर पत्रकार परिषद घेऊन नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप आणि स्पष्टीकरणांचे फेऱ्या सुरु झाल्या आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहावरून सुरु झाले आरोप रामदास कदम यांच्या पत्नीच्या १९९३ सालच्या भाजण्यावर गेले आहेत.


पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या नार्को टेस्टची मागणी केली होती आता यावर पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी आरोपांचं खंडन केलं आहे. माझ्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतले नव्हते. तर स्टोव्हचा भडका उडाल्याने ती भाजली होती, असे रामदास कदम यांनी म्हटले.

अनिल परब यांनी जी मागणी आहे, त्याप्रमाणे माझी नार्को टेस्टची तयारी आहे. १९९३ साली आमच्या खेडामधील घरी दोन स्टोव्ह होते. माझी पत्नी घरात स्वयंपाक करत होती तेव्हा तिच्या साडीचा पदर स्टोव्हमध्ये गेला आणि त्याने पेट घेतला आणि त्यानंतर स्टोव्हचा भडका उडाला. त्यावेळी मीच तिला वाचवले होते. तिला वाचवताना आगीत माझे दोन्ही हात भाजले होते. 

सहा महिने माझी पत्नी मुंबईच्या जसलोक रुग्णालयात होती. मीदेखील सहा महिने तिकडेच होतो. आजही आम्ही नवरा-बायको जीवभावाने संसार करत आहोत. मात्र, अनिल परब यांनी आमची बदनामी केली. मी यासाठी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन, असा इशारा रामदास कदम यांनी दिला.

रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत अनिल परब यांच्यावर काही आरोप केले. अनिल परब हे वकील आहेत, सुशिक्षित आहेत. पण चंद्रग्रहणाच्या रात्री त्यांनी वरळी कोळीवाड्यात रात्री 12 वाजता बकऱ्याचा बळी दिल्याचे सांगितले जाते. अनिल परब आणि एक बांधकाम व्यावसायिक स्मशानभूमीत आले होते. त्यांच्या गाडीत बकरा होता. त्यांच्यासोबत दोन तांत्रिकही आले होते.

या तांत्रिकांनी माझे आणि योगेश कदम यांचे नाव घेऊन बकऱ्यांचा बळी दिला, असे स्मशानभूमीतील लोक सांगतात.मला याबद्दल खात्रीशीर आणि नेमकी माहिती नाही. तेथील लोकांनी मला ही गोष्ट सांगितली. पण अनिल परब यांनी खरोखरच हे अघोरी कृत्य केले असेल तर ते चूक आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group