मोठी बातमी! मुंबई पदवीधरमध्ये उबाठा गटाची सरशी तर कोकण भाजपा कडे
मोठी बातमी! मुंबई पदवीधरमध्ये उबाठा गटाची सरशी तर कोकण भाजपा कडे
img
Jayshri Rajesh
मुंबई पदवीधरमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब हे विजयी झाले आहेत.  मुंबईतून अनिल परब यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज मतमोजणी सुरु होती . शिक्षक मतदारसंघात भाजप, ठाकरे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी, सुभाष मोरे, शिंदे गट यांचे उमेदवार रिंगणात होते .

मुंबईतील पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा चार मतदारसंघात ही निवडणूक झाली होती. मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब आणि भाजपाचे उमेदवार किरण शेलार यांच्यात थेट लढत होती. अनिल पराब यांचा मोठा मताधिक्याने विजय झाले. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या निरंजन डावखरे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत आपला गड कायम राखला आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार आहेत. गेली ३० वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचे ठाकरे गटापुढे मोठे आव्हान होते. यंदा भाजपचे किरण शेलार यांच्यासाठी भाजपने मुंबईतील आपली सर्व यंत्रणा कामाला लावली. मात्र त्यात त्यांना यश मिळू शकले नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group