नाशिकरोड (चंद्रकांत बर्वे ) : आई आणि लेकरू यांचे नाते हे जगात आगळेवेगळे असते. केवळ मनुष्य प्राण्यांमध्ये नव्हे तर कोणत्याही वन्य प्राण्यांमध्ये आई आणि त्याचे पिल्लू किंवा बछडे यांचे नाते हे सर्वांनाच परिचित आहे . आई जशी आपल्या मुलाची काळजी घेते . त्यापेक्षाही जास्त काळजी पशुपक्षी तथा जनावरे किंवा वन्यप्राणी घेताना दिसून येतात . याचा प्रत्यय नुकताच वडनेररोड परिसरात आला . 
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बिबट्याने एका लहान मुलाला पळून नेण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या आई-वडिलांनी बिबट्याच्या तावडीतून त्या मुलाची सोडवणूक केली . तशाच प्रकारची घटना मात्र ती वन्य प्राण्यांच्या बाबतीत घडली . एका मादी बिबट्या समवेत दोन लहान बछडे फिरत असताना वन्य विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये एक बछडे अडकले . तेव्हा बाहेर असलेल्या मादी बिबट्याने डरकाळी फोडून परिसर दणाणून सोडला होता . अखेर वन विभागाला मायेचा पाझर फुटला आणि त्यांनी त्या पिंजऱ्यातील छोट्या पिल्लाची सुटका केली .
गेल्या गुरुवारी, वडनेर रोड, हंडोरे मळा येथे एक शौर्यपूर्ण घटना घडली. लहान मुलांना बिबट्याच्या तावडीतून वाचवताना, एक बापाने आपल्या जीवाची पर्वा न करता बिबट्याचे पाय धरून ठेवले आणि आपल्या मुलाला प्राणदान मिळवून दिले. याच घटनेची पुनरावृत्ती नुकतीच घडली, जिथे हल्लेखोर मादी बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात अडकलेला आढळला. मादी बिबट्या नेहमीच्या पद्धतीने डरकाळी फोडून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करत होती. वनविभागाला मातृप्रेमापुढे शरणागती पत्करून त्या बछड्याला मुक्त करावे लागले. 
मागील २६ डिसेंबर रोजी, संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ऋषिकेश प्रकाश चंद्रे (वय ४) हंडोरे मळा येथील पत्र्याच्या शेड बाहेर खेळत असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्याला मान धरून फरपटत नेले. ऋषिकेशचे वडील, प्रकाश चंद्रे, यांनी तात्काळ बिबट्याच्या अंगावर झडप घालून त्याचे दोन्ही मागील पाय धरून ठेवले. आरडाओरडा करून त्यांनी गर्दी जमवली, ज्यामुळे बिबट्याने ऋषिकेशला सोडून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेशला तात्काळ बिटको व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर, माजी नगरसेवक जगदीश पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा पदाधिकारी विक्रम कोठुळे यांनी वनविभागाला पिंजरा लावण्याबाबत आणि ऋषिकेशच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी केली. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावला.
दुसऱ्या दिवशी, बुधवारी साडेसात वाजेच्या सुमारास पिंजऱ्याच्या दिशेने आवाज येऊ लागला. वनविभागाच्या अधिकारी अनिल आहेरराव यांच्या उपस्थितीत, मादी बिबट्याचे काही महिन्यांचे बछडं पिंजऱ्यात अडकलेले आढळले. मादी बिबट्या बछड्याला मेल्यानंतर येथील नागरिकांना त्रास देईल असे लक्षात आल्यावर, वनविभागाने त्याला मुक्त करणे पसंत केले. मातृशक्तीच्या प्रेमामुळे, मादी बिबट्या बछड्याला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि ती सुरक्षितपणे मुक्त झाली. या संपूर्ण घटनेनेमाय आणि लेकराची वेगळीच कहाणी समोर आली असून परिसरात त्याची चर्चा सुरू आहे .