सिन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मजूर जखमी
सिन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मजूर जखमी
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी):-येथून जवळ असलेल्या व सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी-नायगाव रोड वरील मजूर वस्तीत राहणार शेतमजूर अंघोळी साठी गंगेवर जात असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून जबर जखमी केले. बिटको रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
   
 जोगलटेंभी-नायगाव रोड येथे पिंपळे वस्ती असून तिथे शेतमजूर हिरामण त्रंबक मोरे (वय35) हे श्रावण मास सुरू असल्याने घरा जवळ असलेल्या गोदावरी-दारणा संगम नदी तीरावर अंघोळी साठी जात असताना घरा समोरील सोयबीन पिकात दडून बसलेल्या बिबट्याने जोरदार डरकाळी फोडत मोरे यांच्या वर हल्ला केला. आवाज ऐकून वस्ती वरील नागरिक हिरामण मोरे यांच्या दिशेने धावले.

गर्दी पाहून बिबट्याने धूम ठोकल्याने मोरे थोडक्यात बचावले. बिबट्याच्या हल्ल्यात मोरे यांच्या कानाला आणि डोक्याला दात व नखे लागून जबर जखमी झाले असून बिटको रुग्णालयात त्याच्या वर उपचार सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group