सिन्नर तालुक्यात एका दिवसात 2 बिबटे पिंजऱ्यात जेरबंद
सिन्नर तालुक्यात एका दिवसात 2 बिबटे पिंजऱ्यात जेरबंद
img
दैनिक भ्रमर
नाशिक :  सिन्नर तालुक्यातील निमगाव शिवारात काल दिवसभरात २ बिबटे पिंजऱ्यात जेरबंद झाले आहेत.  येथे बिबटे असल्याचे रहिवाश्यांनी वन विभागास कळविले होते. त्यानुसार मौजे निमगाव येथील संजय पुंजा टोक यांच्या मा.ग.नं.16 मध्ये वन विभागाने पिंजरा लावला होता.

या पिंजऱ्यामध्ये काल नर बिबट्या अंदाजे एक ते दीड वर्ष जेरबंद झाला. आणखी बिबटे असल्याची शंका आल्याने पिंजरा तिथे तसाच ठेवण्यात आला होता. त्यामध्ये काल रात्री पुन्हा एक बिबट जेरबंद झाला.

पश्चिम भागाचे उपवनसंरक्षक पंकज कुमार गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक पवार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर (प्रा.) श्रीमती मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम मधील सिन्नरचे वनपाल एस. एम. बोकडे, श्रीमती व्ही. टी. कांगणे, मधुकर शिंदे, रोहित लोणारे, रवि चौधरी यांनी हा बिबट सुरक्षितपणे वैद्यकीय तपासणी करीता मोहदरी (माळेगाव) वन उद्यान येथे नेण्यात नेला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group