राज्यातील अनेक जिल्ह्यात बिबट्याचा लोकवस्तीशेजारील वावर चिंता वाढवणारा आहे. विशेषतः अबालवृद्धांवरील हल्ल्यांमुळे शेतवस्तीवरील नागरीक भयग्रस्त आहेत. अनेक जनावरांचा बळी गेला आहे. पण केवळ पिंजरे लावून बिबट्याची वाट पाहण्यात धन्यता मानण्यात येत आहे.

भाजप नेते सुजय विखे पाटील, बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी बिबट्यांना मारण्याची परवानगी देण्याची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ते आता हायकोर्टाचा पण दरवाजा ठोठावणार आहेत.
माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी या प्रश्नाला वाचा फोडली आहे. सततच्या घटना घडत असतानाही राज्य पातळीवर कोणताचा तोडगा न निघाल्याने ते अस्वस्थ झालेत. बिबट्याचे मानव आणि पशुधनावर हल्ले वाढले आहेत. बिबट्यांना मारण्याची परवानगी द्या, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे.
भाजपचे माजी खासदार सुजय विखे न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. संगमनेर आणि राहाता तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात लहान बालकांचा तसेच नागरीकांचा मृत्यू झाला आहे. बिबट्या माणसांना मारू शकतो, मात्र माणसं बिबट्याला मारू शकत नाही. बिबट्यांची संख्या हजारोंनी वाढली आहे. बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे विखे म्हणाले.