पेठ तालुक्यातील भुवन वनपरिक्षेत्रातील उस्थळे वन परिमंडलात परिसरात गेली महीनाभरा पासुन बिबट्याचा वावर असल्याचे उस्थळे व परिसरातील नागरिकांनी वनविभाग प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश साळवे यांचे कडे माहीती दिली होती त्या अनुशंगाने वनविभागाचे सदरील परिसरात कॅमे-यांच्या सहाय्याने ट्रॅप लावुन शहानिशा केली असता परिसरात बिबट्याचा अधिवास असल्याचे आढळून आले.
तदनंतर उस्थळे ग्रामपंचायत अंतर्गत सर्व ग्रामस्थ व शालेय विद्यार्थांस वन्यजीव रक्षकांडुन मानव व वन्यजीव संघर्ष आदींबाबत सविस्तर माहीती देत नागरिकांनी घ्यावयाची सुरक्षितता व काळजी बाबत जनजागृतीपर मार्गदर्शन केले होते.उस्थळे परिसरात लावलेल्या पिंज-यात एक महीन्या पासुन अधिवास असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे अंदाजे तीन वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या पिंज-यात जेरबंद करण्यात आला.
वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश साळवे यांचे मार्गदर्शनात वनपरिमंडळ अधिकारी तानाजी भोये वनरक्षक मझहर शेख,दिलशाद पठाण भरत चौधरी,कुसुम गवळी आदींसह परिसरातील नागरिकांच्या सहकार्यातून सदरील कारवाई करण्यात आली.