नाशिकमध्ये चोपडा लॉन्स ते रामवाडी रस्त्यावर बिबट्याचे दर्शन
नाशिकमध्ये चोपडा लॉन्स ते रामवाडी रस्त्यावर बिबट्याचे दर्शन
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- शहरात वारंवार बिबट्यांचे दर्शन होत आहे. काही दिवसांपूर्वीच गोविंदनगर व सावतानगर परिसरातून २ बिबट्यांना रेस्क्यु करण्यात आले होते. 

आज रात्री ९ वाजेच्या सुमारास चोपडा लॉन्स ते रामवाडी रस्त्यावर पेट्रोल पंपा जवळून एक बिबट्या रस्ता क्रॉस करताना एका इसमाने पाहिले होते. मात्र, परिसरात दाट झाडी असल्याने बिबट्या तिथून निघून गेला. त्यांनी त्वरित वनविभागाला कळविले.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही तेथे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठेच बिबट्या सापडला नाही. तरी, नागरिकांनी सावधान राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

परिसरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, गोदावरी ब्रिज दरम्यान आज सायंकाळी बिबट्या वावरतांना दिसला आहे, तरी सर्वांनी सतर्क राहावे, वनविभागास कळविण्यात आलेले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group