जय भवानी रोडवर पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार; नागरिक भयभीत
जय भवानी रोडवर पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार; नागरिक भयभीत
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी):-जयभवानी रोड वरील लोणकर मळा मुख्य रस्त्यावर मध्यरात्री बिबट्याचा मुक्त संचार सुरु होता. एका सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये तो कैद झाल्याने रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल मध्यरात्री 2 वाजून 45 मिनिटांने लोणकर मळा, मुख्य रस्ता येथे कुत्रे चा जोरदार भुकण्याचा आवाज आल्याने काही राहिवसी यांना जाग आली. त्यांनी बाहेर डोकावून पाहिले असता फर्नांडीस वाडी कडून आत लोणकर मळा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार सुरु होता.

पाच, दहा मिनिटांनंतर बिबट्या पुन्हा माघारी फिरला मात्र जाताना बिबट्या काही कुत्र्याच्या दिशेने धावला काहीही हाती न लागल्याने त्याच्या हातून शिकार हुकली. हा सर्व प्रकार रहिवसी संदीप लोणकर यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे.

या भागातील सामाजिक कार्यकर्ते ऍड नितीन पंडीत यांनी याबाबत वन विभागाचे अधिकारी यांचेशी संपर्क केला. बिबट्याच्या मुक्त संचारा मुळे रहिवसी, नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group