Nashik : दारणा काठच्या परिसरात बिबट्या जेरबंद
Nashik : दारणा काठच्या परिसरात बिबट्या जेरबंद
img
दैनिक भ्रमर
भक्ष्याच्या शोधात बिबटे अनेक वेळा शहर  व जिल्ह्यातील परिसरात आढळून येतात.

दारणा काठच्या परिसरात अनेकवेळा बिबट्यांचे रेस्क्यू वन विभागाने केले आहे. काल अजून एका बिबट्याला रेस्क्यु करण्यात वन विभागाला यश आले आहे. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, देवळाली कॅम्प येथील दारणा काठच्या परिसरात लहवित येथे कोंडाजी एकनाथ गवळी यांच्या गट क्रमांक ७८ मध्ये गेल्या आठवड्यात बिबट्या दिसला होता. तेव्हापासून परिसरातील नागरिक बाहेर पडण्यास घाबरत होते. याबाबत वन विभागाला कळविले असता त्यांनी गवळी यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता. 

या पिंजऱ्यात अखेर काल तो बिबट्या जेरबंद झाला. हा बिबट्या पाच वर्षांचा नर जातीचा आहे. तो जेरबंद झाल्यानंतर वन विभागाने त्याला गंगापुरच्या रोपवाटिका येथे अधिवासात सोडले. बिबट्याचे रेसक्यू झाल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group