शिवाजी चुंभळे यांच्या शेतात पहाटे बिबट्या जेरबंद
शिवाजी चुंभळे यांच्या शेतात पहाटे बिबट्या जेरबंद
img
Dipali Ghadwaje
पाथर्डी शिवारात पिंपळगाव खांब येथील शिवाजी चुंभळे यांच्या शेतात आज पहाटे बिबट्या जेरबंद झाला आहे.  31 मे रोजी एका मजुराला चुंभळे यांच्या शेतात बिबट्या दिसला होता. तेव्हापासून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काही दिवसांपूर्वी बिबट्याने एका शेतमजुरावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता.

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी चुंभळे यांनी केली होती. त्यानुसार वनविभागाने शेतात पिंजरा लावला. आज पहाटेच्या सुमारास बिबट्या त्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाने कळविले आहे. दरम्यान हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची माहिती मिळताच मळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांसह शेतमजूरांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती
इतर बातम्या
Join Whatsapp Group