नाशिकच्या मखमलाबाद शिवारात मध्यरात्री बिबट्याचे दर्शन ; बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद
नाशिकच्या मखमलाबाद शिवारात मध्यरात्री बिबट्याचे दर्शन ; बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद
img
DB
नाशिक  मखमलाबाद रस्त्यावरील गोदा नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ओमकार पिंगळे यांच्या घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचा वावर स्पष्टपणे कैद झाला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार , सुमारे रात्री १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून बिबट्या काही वेळ परिसरात फिरताना दिसून आला. गोदा नगरीसह मखमलाबाद परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाल्याच्या घटना समोर येत आहेत. या परिसरात वनक्षेत्र लागून असल्याने बिबट्याचा वावर सतत जाणवतो असे ऋषिकेश पिंगळे यांनी सांगितले.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लहान मुलांना एकटे बाहेर न सोडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. स्थानिक प्रशासन व वनविभागाकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे. वनविभागाने नागरिकांना सावध राहण्याचे तसेच बिबट्या दिसल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group