पाथर्डी गावाजवळ स्कूल बस व कारचा  भीषण अपघात; कारचा चक्काचूर
पाथर्डी गावाजवळ स्कूल बस व कारचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी) :- पाथर्डी गावाजवळ कारचे टायर फुटून स्कूल बस व कारचा भीषण अपघात झाला.


याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की आज पाथर्डी गावाजवळील सर्कल विहीर गावाजवळ एक्सयूव्ही 300 कारचे टायर फुटले. त्यावेळी तेथून विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस जात होती. समोरून भरधाव वेगात कार आली आणि तिचे टायर फुटल्याने ती गाडी बसवर आदळली.

झालेल्या या अपघातात बसमधील काही विद्यार्थी जखमी झाल्याचे समजते. कारचा पूर्ण चक्काचूर झाला असून, जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group