वेगाने गाडी चालवणाऱ्या बड्या व्यावसायिकाच्या मुलाने दोघांना चिरडले; 15 तासांत जामीन मंजूर
वेगाने गाडी चालवणाऱ्या बड्या व्यावसायिकाच्या मुलाने दोघांना चिरडले; 15 तासांत जामीन मंजूर
img
दैनिक भ्रमर
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्या मुलगा विशालने मध्यरात्री आपल्या भरधाव कारने दोघांना चिरडले. पुणे शहरातील कल्याणीनगर येथील परिसरात रात्री अडीच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा भीषण अपघात करणाऱ्या अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलेले आहे. अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दुचाकीवर असलेली मुलगी हवेत उडली. त्यानंतर जमिनीवर आदळून तिचा जागीच मृत्यू झाला.

अपघातातील अनिस अवलिया याचा उपचार सुरू असताना तर अश्विनी कोस्ता हिचा जागीच झाला. हे दोघेही राजस्थानमधील होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी आणि अनिस हे दोघेही त्यांच्या मोटारसायकलवरून कल्याणीनगरकडून येरवड्याकडे मित्रांसह जात होते. त्यावेळी पोर्से ही आलिशान कार याच रस्त्याने भरधाव वेगात निघाली होती. कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या गाडीने मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली. यामध्येच दोघांचा मृत्यू झाला.

या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आरोपीला ताब्यात घेतला असून त्याच्यावर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी 200 च्या स्पीडने होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर कारमधील एअर बॅग उघडल्या होत्या. कारमधून तीन मुले बाहेर पडले. लोकांनी त्यांना चांगलाच चोप दिल्याचे प्रत्यक्षदर्शीनी लोकाने सांगितले.

वेंदात अग्रवालला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने काही अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. मात्र, याप्रकरणी मुलाच्या वडिलांवर म्हणजे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group