पुण्याच्या दौंड शहरात पाऊसाने पहिला बळी घेतला आहे. पावसामुळे ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावर घराची भिंत पडली. यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वृद्ध महिला दुकानात बसली होती, तेव्हा हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ताराबाई विश्वचंद आहिर असे ७५ वर्षीय वृद्ध महिलेचे नाव आहे. त्यांच्या अंगावर जुन्या बांधकामाची भिंत कोसळली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातामुळे त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. रुग्णालयात उपचार सुरु असताना ताराबाई यांचा मृत्यू झाला.