राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असल्याने आता महाराष्ट्रातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरातील शिवशाही या एसटी बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. दरम्यान, या प्रकर्णवरून आता राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक झाले आहे.
पुण्यातील स्वारगेट परिसरातील शिवशाही या एसटी बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. या घटनेनतंर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार आहे. आता याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील घटनेबद्दलची सविस्तर माहिती दिली. पोलिसांच्या रिपोर्टनंतर पुढील गोष्टी ठरवता येतील, अशी माहिती विजया रहाटकर यांनी दिली.
“येत्या ३ दिवसात याबद्दलचा अहवाल द्या”
“कालची पुण्यात घडलेली घटना धक्कादायक आहे. या विषयावर राष्ट्रीय महिला आयोगाने सुमोटो याचिका दाखल केली आहे. राज्याच्या पोलिस महसंचालकाना पत्र पाठवलं आहे. पीडित महिलेची सुरक्षितता आणि तीच मानसिक आरोग्य तपासण्यासाठी सांगितल आहे. आरोपीला तात्काळ अटक करून ही केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या ३ दिवसात याबद्दलचा अहवाल द्यावा”, अशा सूचनाही आम्ही दिल्या आहेत, असे विजया रहाटकर म्हणाल्या.
याशिवाय आणखी काही दुसऱ्या घटना घडल्या आहेत का? हे पाहणं देखील कमीशनला महत्त्वाचं वाटतं आहे. संपूर्ण विषयात राष्ट्रीय महिला आयोग काम करेल. पुढील काळात या सगळ्याची माहिती समोर येईल. सगळ्याच सुरक्षा ऑडिट असणं महत्त्वाचं आहे. महिला सुरक्षेबाबत सर्व सरकार यांना निर्देश देणे गरजेचं आहे. कॅमेराबाबत काय माहिती आहे, ही तिथून मागवू. पुणे शहर उत्तम आहे. एका घटनेमुळे पूर्ण शहराकडे बोट दाखवणे योग्य होणार नाही, असेही विजया रहाटकर यांनी म्हटले.
“पोलिसांनी उत्तम तपास करायला हवा, ते करत आहेत. आतापर्यंत २३ सुरक्षा रक्षकांना निलंबित केल्याची माहिती आहे. या सगळ्या घटनेकडे राष्ट्रीय महिला आयोग लक्ष ठेवून आहे. पुण्यात काही घटना घडल्या खरं आहे. परंतु यामुळे शहराला बदनाम करणं योग्य नाही. पोलिस तपास करत आहेत. पोलिसांना काम करायला आपण वेळ दिला पाहिजे. जिथ महिलांची सुरक्षा असेल तिथे आपण लक्ष दिलं पाहिजे. पोलिसांच्या रिपोर्टची आम्ही वाट पाहत आहोत. त्यानंतर पुढील गोष्टी ठरवता येतील”, असेही विजय रहाटकर यांनी सांगितले.