गणेशोत्सवाआधी ढोल-ताशा पथकांना मोठा दिलासा: , पोलिसांनी घेतला
गणेशोत्सवाआधी ढोल-ताशा पथकांना मोठा दिलासा: , पोलिसांनी घेतला "हा" मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
राज्यातील किंवा देशातील नाही तर जगभरातील गणेशभक्त पुण्यातील गणेशोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे  पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे गणेशभक्तांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू असते.  अशातच यावर्षी ढोल-ताशा पथकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे पोलिसांनी ढोल-ताशा पथकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यंदा पारंपारिक वाद्यांवर खटले होणार नाहीत, असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  पारंपरिक वाद्यांवर यावर्षी खटले होणार नाहीत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ढोल -ताशा महासंघ महाराष्ट्रच्यावतीने पुणे शहरातील ढोल-ताशा पथकांचा प्रातिनिधीक वाद्यपूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी पुणे पोलिसांनी ढोल-ताशा पथकांबाबत मोठा निर्णय जाहीर केला.

यावेळी यंदा पारंपारिक वाद्यांवर कोणतेही खटले होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

पारंपरिक वाद्यांवर कोणत्याही प्रकारचे खटले नाहीत, तसे असतील तर ते नक्की थांबवू. यावर्षी पारंपरिक वाद्यांवर खटले होणार नाहीत असा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.

ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्र तर्फे पुणे शहरातील ढोल-ताशा पथकांचा प्रातिनिधिक वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात पार पडला. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पथकांनी आपला सराव लवकर सुरु करून रात्री १० पूर्वी बंद करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group